• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हरांसाठी स्वतंत्र वैद्यकीय (Medical) पॉलिसी

मा. आयुक्त साहेब,
पुणे महानगरपालिका,
पुणे.
विषय : पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हरांसाठी स्वतंत्र वैद्यकीय (Medical) पॉलिसी लागू करणेबाबत.
महोदय,
पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत कंत्राटी ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेले श्री. आनंद पाटील यांचा घरी जात असताना अपघात झाला असून, सध्या त्यांच्यावर ESI हॉस्पिटल, बिबवेवाडी येथे उपचार सुरू आहेत. सदर अपघातामुळे ड्रायव्हर वर्गास भेडसावणाऱ्या वैद्यकीय अडचणी पुन्हा एकदा समोर आलेल्या आहेत.
सध्या पुणे महानगरपालिकेमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेली WC (Workmen’s Compensation) पॉलिसी ही मर्यादित स्वरूपाची असून, त्यामध्ये अनेक प्रकारचे आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया, दीर्घकालीन उपचार तसेच अपघातानंतरचे फॉलो-अप उपचार समाविष्ट नसल्यामुळे कंत्राटी ड्रायव्हरांना वेळेवर व योग्य उपचार घेणे शक्य होत नाही.
कंत्राटी ड्रायव्हर हे दररोज अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत वाहन चालवत महानगरपालिकेची अत्यावश्यक सेवा बजावत असतात. अशा परिस्थितीत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र, सर्वसमावेशक (Comprehensive) मेडिकल पॉलिसी लागू करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून अपघात किंवा आजाराच्या प्रसंगी आर्थिक अडचणींमुळे उपचारात कोणतीही अडथळा निर्माण होणार नाही.
तरी आपण या विषयाकडे सकारात्मक व मानवी दृष्टीकोनातून पाहून, पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हरांसाठी ESI व्यतिरिक्त स्वतंत्र व प्रभावी मेडिकल इन्शुरन्स / हेल्थ पॉलिसी लागू करण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, ही नम्र विनंती.
आपण याबाबत योग्य तो न्याय देऊन कंत्राटी ड्रायव्हर वर्गास दिलासा द्याल, अशी आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
धन्यवाद.
आपला नम्र,
श्री. शरद भाकरे
जनरल सेक्रेटरी श्री. मनीष भाई शेठ

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required