• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

पुणे महानगरपालिकेतील नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विमाननगर आरोग्य कोठी येथे कंत्राटी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. जया वाल्हेकर यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला आहे

पुणे महानगरपालिकेतील नगर रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत विमाननगर आरोग्य कोठी येथे कंत्राटी सेविका म्हणून कार्यरत असलेल्या सौ. जया वाल्हेकर यांच्या पतीचा गंभीर अपघात झाला आहे. या अपघातामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला असून मानाचे हाड तुटलेले आहे.
अपघातानंतर तातडीच्या उपचारासाठी त्यांना इमर्जन्सीमध्ये शाह हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने त्यांनी कामगार हितरक्षक संघटनेशी संपर्क साधला. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन संघटनेमार्फत तात्काळ कार्यवाही करून त्यांना ESI हॉस्पिटल, बिबवेवाडी येथे दाखल करण्यात आले आहे.
सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबासाठी मानसिक आधार द्यावा व आवश्यक त्या सहकार्याकरिता सज्ज रहावे, ही विनंती.
आपला सेवक,
श्री. शरद भाकरे
श्री. मनीष भाई शेठ

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required