एकी हेच बळ 💪🏻
वरच्या वाक्याला अनुसरुन ESIC हे कार्ड आपल्या कंत्राटी कामगारांसाठी खुप महत्वाचे आहे. ज्याचे जळते त्यालाच कळते याचा प्रत्यय आज मला आला आहे.
मी शेखर बाळे, पोकळे शाळा आरोग्य कोठी येथे २ वर्ष कार्यरत आहे. मला दि.१७ तारखेला मध्यरात्री मला अचानक हृदय विकारचा झटका आला आता मी डॉ. डी. व्हाय. पाटील हॉस्पिटल, चिंचवड येथे ॲडमिट आहे माझी ट्रीटमेंट चांगली व काळजीपुर्वक व्हावी यासाठी कामगार हितरक्षक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरदभाऊ भाकरे साहेब हे ग्लोबल हॉस्पिटल किंवा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे प्रयत्न करत आहेत.
आज माझ्यावर वेळ आली उद्या तुमच्यावर येऊ शकते.
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.
आजची आपली एकी उद्या आपले भविष्य बदलु शकते.
विशेष सहकार्य : शरदभाऊ भाकरे साहेब आणि पुर्ण टीम.
पुढील भाग क्रमशः…
