• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

श्री. जय अशोक जानराव यांच्या वडिलांचा रात्री एक्सीडेंट

नमस्कार सर्व कामगार बंधू आणि भगिनींनो
सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत नरे आंबेगाव आरोग्य कोटी येथील कंत्राटी सफाई सेवक श्री. जय अशोक जानराव यांच्या वडिलांचा रात्री एक्सीडेंट झालेला आहे त्यांना इमर्जन्सी मध्ये नवले हॉस्पिटल येथे ऍडमिट करण्यात आले होते पण त्यांच्याकडे एकही रुपया नव्हता आणि त्यांना भारती हॉस्पिटल येथे शिफ्ट करण्यासाठी सांगितले पण पैसे नसल्यामुळे त्यांनी ससून हॉस्पिटल येथे नेण्याचा निर्णय घेतला ही जी परिस्थिती त्यांच्यावर आली याचं प्रमुख कारण त्यांच्याकडे ई एस आय सी कार्ड नसल्यामुळे त्यांच्याकडे ईएसआयसी कार्ड असतं तर त्यांना भारती हॉस्पिटलमध्येच उपचार मिळाले असते ही सर्व जबाबदारी कॉन्ट्रॅक्टरची असते कार्ड अपडेट करून कुटुंबाचे नाव ॲड करून देणे पण हे त्यांच्याकडे नव्हतं आम्ही वारंवार पत्र व्यवहार केलेले आहेत वारंवार मीटिंग घेऊन सांगितलेलं आहे तरीसुद्धा हे कुणीही ऐकायला तयार नाही त्यामुळे आपल्याला आंदोलन करावं लागणार आहे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालया समोर तरी सर्व कामगारांना विनंती आहे माझी ज्या वेळेस आंदोलन असेल त्या दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येने तिकडं उपस्थित राहायचं आहे सर्व वर्गातले कामगार आले पाहिजे कारण ईएसआयसी हा प्रॉब्लेम सर्वांचाच आहे
हा प्रकार रात्री 12:30 वाजता घडलेला आहे मला त्यांनी पावणे एक वाजता फोन केला होता

कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य
संस्थापक अध्यक्ष श्री. शरद भाकरे

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required