• कामगार हितरक्षक संघ
  • सोम - शनि: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ६

ॲड. शुभम साके यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे

प्रेसनोट (कायदेशीर सल्लागार नियुक्ती)

कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे कायदेशीर सल्लागार म्हणून ॲड. शुभम साके यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मा. शरद भाकरे, महासचिव श्री. मनीषभाई शेठ, उपाध्यक्ष श्री. अरुण वाघमारे, संघटक श्री. कपिल वाघमारे, शहर संघटक श्री. विशाल भंडारे, संघटक श्री. सचिन भिसे, विभागीय अध्यक्ष श्री. मनोज बागडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नियुक्तीपत्र देताना संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, यापुढे संघटनेचे सर्व कायदेशीर विषय, कामगारांचे हक्क, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अडचणी, तक्रारी यावर ॲड. शुभम साके मार्गदर्शन व प्रतिनिधित्व करतील.

ही नियुक्ती संघटनेच्या कायदेशीर लढ्याला अधिक बळ देणारी ठरेल, असा विश्वास अध्यक्ष शरद भाकरे यांनी व्यक्त केला.

Leave A Comment

All fields marked with an asterisk (*) are required