मी. दिपक वाघे
माझे वडील श्री. राजेंद्र वाघे सध्या भारती हॉस्पिटल, पुणे येथे उपचार घेत आहेत. त्यांची शुगर खूप वाढल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला. ही परिस्थिती आमच्यासाठी अत्यंत धक्कादायक असून, आमची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे.
उपचाराच्या काळात हॉस्पिटलकडून सातत्याने बाहेरून औषधे आणण्यास सांगितले जात होते, जे आमच्यासाठी अधिक कठीण बनत होते. त्या परिस्थितीत मी कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा. श्री. शरद भाकरे साहेब यांच्याशी संपर्क केला.
भाकरे साहेबांनी तात्काळ लक्ष घालून सर्व मदत उपलब्ध करून दिली. त्यानंतर मला कुठलीही औषधे बाहेरून आणावी लागली नाहीत, तसेच हॉस्पिटलमध्ये एक रुपयाही भरावा लागला नाही. ही आमच्यासाठी खूप मोठी मदत होती.
मी व माझे संपूर्ण कुटुंब मा. भाकरे साहेबांचे मनःपूर्वक आभार मानतो. संकटाच्या वेळी संघटना आणि त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी आधार बनले.
आपला कृतज्ञ,
दिपक वाघे
