आजचे आंदोलन यशस्वी झाले! 🙏
बिबवेवाडी ESIC हॉस्पिटल येथे आज कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेले आंदोलन संपूर्णतः यशस्वी झाले आहे. प्रशासनाने सर्व मागण्या मान्य केल्या असून, आता कामगारांना ESI अंतर्गत हक्काचे उपचार मिळतील, तसेच ससूनकडे जबरदस्तीने पाठवण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
या यशस्वी लढ्याबद्दल सर्व कामगार बांधव, पदाधिकारी, महिलांचे मन:पूर्वक आभार, तसेच सर्व पत्रकार, विशेषतः ‘सकाळ’ परिवाराचे आणि साम टीव्हीचे आभार, ज्यांनी कामगारांच्या आवाजाला व्यासपीठ दिलं.
लढा अजून थांबलेला नाही… आता फक्त सुरुवात आहे!
कामगारांच्या हक्कासाठी संघटना नेहमीच सज्ज आहे! ✊🚩
– कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य
