आज लोहगाव आरोग्य कोटी येथे कंत्राटी कामगारांच्या विविध समस्या, विशेषतः ESIC व हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत कामगारांनी आपल्या अडचणी मांडल्या व संघटनेने त्याचे गांभीर्याने परीक्षण केले.
या वेळी उपस्थित होते:
🔸 संस्थापक अध्यक्ष – श्री. शरद भाकरे
🔸 महासचिव – श्री. मनीष भाई शेठ
🔸 उपाध्यक्ष – श्री. अरुण भाऊ वाघमारे
🔸 अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते
या बैठकीला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेने सर्व कामगारांना विश्वास दिला की त्यांच्या हक्कासाठी आवश्यक ते सर्व पावले उचलण्यात येतील. ✊
“कामगारांच्या हक्कासाठी आम्ही कटिबद्ध आहोत!”
– कामगार हितरक्षक संघ, महाराष्ट्र राज्य
